-शिर्डी लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. श्रीरामपूर येथील थत्ते मैदानात पार पडलेल्या ह्या सभेत जनतारूपी मशालीची ताकद आणि धग सर्वांनी पाहिली.
‘देशभक्त म्हणून एकत्र आलो आहोत, देशभक्त म्हणून देशासाठी एकत्र लढू’ हा मनसुबा उपस्थित प्रत्येकाच्या मनात होता.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत, ‘शेतकऱ्यांच्या पत्नीचं मंगळसूत्र तुटतंय त्यावर मोदी बोलत नाहीत, बेकारीतला ‘बे‘ काढायला मोदी तयार नाहीत; मग कोणत्या देशाचे तुम्ही पंतप्रधान आहात?’ हा थेट सवाल त्यांनी मोदींना केला.
सभेस माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार शंकरराव गडाख पाटील, आमदार लहुजी कानडे, आमदार सुनील शिंदे, आमदार नितीन देशमुख, शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे तसेच इंडिया – महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.