आंतर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुले व मुलींमध्ये पुणे शहर विजयी
श्रीरामपूर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या रावबहादुर नारायणराव बोरावके महाविदयालयाच्या वतीने दि.25 ते 27 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत आंतर विभागीय व्हॉलीबॉल मुले व मुलींच्या स्पर्धेचे आयोजन महाविदयालयाच्या मैदानावर करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये अहमदनगर, नाशिक, पुणे शहर, पुणे जिल्हा या चार विभागाच्या मुले व मुलींच्या संघाने सहभाग घेतला होता.
तीन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये अत्यंत चुरशीचे सामने झाले. या आंतर विभागीय व्हॉलीबॉल मुले स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक – पुणे शहर, द्वितीय क्रमांक – पुणे जिल्हा, तृतीय क्रमांक – अहमदनगर व चर्तुर्थ क्रमांक – नाशिक. तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक – पुणे शहर, द्वितीय क्रमांक – नाशिक, तृतीय क्रमांक – पुणे जिल्हा व चर्तुर्थ क्रमांक – अहमदनगर.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व श्रीरामपूर रयत शैक्षणिक संकुलाच्या चेअरमन मीनाताई जगधने यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. आंतर विभागीय स्पर्धेतील विजयी संघांना व खेळाडूंना महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रविण बडधे यांच्या हस्ते गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ मेंडल व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहायक क्रीडा संचालक डॉ.दत्ता महादम, उपप्राचार्य डॉ.सुनील चौळके, डॉ.अमरनाथ जगदाळे, पंच प्रमुख आदिनाथ कोल्हे, सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ.विजय म्हस्के यांनी केले. तर शेवटी आभार क्रीडा संचालक प्रा.संभाजी ढेरे यांनी मानले.
आंतर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुले व मुलींमध्ये पुणे शहर विजयी..
- Advertisement -