Saturday, December 9, 2023

पालकमंत्री विखे पाटील म्हणतात… जिल्हा विभाजनाची कुठलीही चर्चा नाही…

श्रीरामपूरच्या विकासाबाबत आम्ही बांधील आहोत. श्रीरामपूर शहराच्या औद्योगिकीकरणासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, जेव्हा याठिकाणी उद्योग येत होते, तेव्हा ते कुणी पळवून लावले हे श्रीरामपूरकर विसरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि. 26 ऑक्टोबरच्या नियोजित शिर्डी दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात आयोजित भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा विभाजनाबाबत बोलताना मंत्री म्हणाले, जिल्हा विभाजनाचा कोणताही निर्णय अद्यापही झालेला नाही. ज्यावेळी जिल्हा विभाजनाचा विषय येईल, त्यावेळी सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल, परंतु जिल्ह्याच्या प्रश्नावर येथे केवळ भूस पांगविण्याचा प्रकार सुरू असल्याचे ना. विखे यावेळी म्हणाले.

भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी जिल्हा विभाजन दृष्टीक्षेपात असल्याचे नुकतेच सांगितले होते.‌मात्र आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा विभाजनाची कुठलीही चर्चा नसल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d