मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला लोकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून २५ हजार लोक नेण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात लोक मेळाव्याला जाण्यास उत्सूक नसल्याने दोनशे पैकी ६० बस रद्द करण्याची वेळ सत्तारांवर आली. उर्वरित १४० बसेसही जेमतेम अर्ध्या भरल्या. सकाळी लोक आझाद मैदानात पोहचले पाहिजे त्यामुळे या अर्ध्या भरलेल्या बसेसच मुंबईकडे रवाना करण्यात आल्या आहेत. गर्दी जमवण्यात हातखंडा असलेल्या अब्दुल सत्तार यांना यावेळी मात्र त्यात अपयश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्याची मोठी जबाबदारी दिली होती.