Simple सिंपल ही एक स्टार्टटअप कंपनी आहे. कंपनीने आपली दुसरी ईलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच केली आहे. ही नवीन स्कूटर ओला आणि एथर या कंपनीशी स्पर्धा करणार आहे. सिंपल एनर्जी या कंपनीने नवीन ईलेक्ट्रिक स्कूटर Simple Dot One देशात लाँच केली आहे. कंपनीने ही स्कूटर ९९,९९९ रुपयांत सादर केली आहे. ही किंमत फक्त प्री बुकिंग युनिट्ससाठी लागू करण्याक आली आहे. ग्राहक ही स्कटर कंपनीच्या अधिकत वेबसाइटवरुन खरेदी करु शकतात. कंपनीने Simple Dot One स्कूटरमध्ये कंपनीने 3.7kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. ही बॅटरी एका चार्जमध्ये 151 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल असा कंपनीने दावा केला आहे. ही स्कूटर 4 रंगामध्ये उपलब्ध आहे. नम्मा रेड, ब्रेझन ब्लॅक, ग्रेस व्हाइट आणि अझूर ब्लू या रंगात स्कूटर उपलब्ध आहे.
Simple Dot One ईलेक्ट्रिक स्कूटर..१ चार्जमध्ये १५१ कि.मी… किमतही कमी
- Advertisement -