अहमदनगर शहर व परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सीना नदीला पूर
अहमदनगर -काल सोमवारी नगर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला. हवामान खात्याकडून नगर जिल्ह्यात 23 ते 28 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट दिला आहे. काल दिवसभर अधूनमधून ढगाळ हवामान होते.
पण त्यानंतर सायंकाळनंतर विविध भागात विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस सुरू झाला. नगर शहर, तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी झाली नगर शहरातील कल्याण रोडवरील सीना नदी दुथडी भरून वाहत आहे या मोसमातील दुसऱ्यांदा सीना नदीला पूर आला आहे मनपा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे
परिणामी कल्याण महामार्गावरील, बोल्हेगाव रस्त्यावरील सीना नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प आहे. सकाळी यावरून जाण्याचा प्रयत्न करणारी वाहने अडकून पडली होती.उपनगरातील काही घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले.