रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. एकीकडे शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण भैय्या सामंत यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. त्याचवेळी भाजपकडून राणेंना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.
शिंदेंनी आणखी एक गड भाजपला सोडला…नारायण राणेंची उमेदवारी जाहीर
- Advertisement -