दुसऱ्यांना गद्धार म्हणवतात मात्र उद्धव ठाकरे किती मोठे गद्दार आहे हे जनतेने पाहिलेले आहे. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा भाजपासोबत परत युती करण्यासाठी किती आतुर आहात. ज्यांच्याजवळ स्वतःचा पक्ष नाही. त्यांची भाजपला तडीपार करण्याची लायकी आहे का? थोड्या दिवसात हेच हद्दपार होतील. उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
आगामी निवडणुकीत सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा लोकसभेचा जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला विजयी करण्यात कणकवली मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असेल. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा भाजपासोबत परत युती करण्यासाठी तुम्ही किती आतुर आहात, असेही ते यावेळी म्हणाले.