Monday, April 22, 2024

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल भारतीय जनता पक्षात प्रवेश

मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी राजकरणात एंट्री घेतली आहे. अनुराधा पौडवाल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अनुराधा पौडवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अरुण सिंह आणि अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत केला अनुराधा पौडवाल यांनी पक्ष प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनुराधा पौडवाल म्हणाल्या, ‘सनातन धर्माशी खोलवर संबंध असलेल्या सरकारमध्ये मी सहभागी होत आहे याचा मला खूप आनंद आहे. आज (16 मार्च 2024) मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, हे माझं भाग्य आहे.’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles