Monday, December 4, 2023

‘सिंघम अगेन’मध्ये करीना कपूरची एन्ट्री, पुढच्या महिन्यापासून शूटिंगला करणार सुरूवात

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटाने थेट पोलीस फ्रेंचायझी सुरू केली. त्यानंतर रोहितने ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग आणि ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत आणखी दोन पोलीस सिनेमाला दिले. आता रोहित शेट्टी लवकरच ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. आता आणखी एक जुनी व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या माध्यमातून परत आली आहे. ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये दिसलेली करीना कपूर खान आता ‘सिंघम अगेन’मधून पुनरागमन करणार आहे.
नुकताच अजय देवगण, रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांनी ‘सिंघम अगेन’चित्रपटाच्या शुभ मुहूर्ताला सुरुवात केली. या तिघांनीही सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. अक्षय कुमारनेही पोलीस फ्रँचायझीमध्ये परतल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. अशामध्ये या चित्रपटामध्ये कोण अभिनेत्री दिसणार याबाबत जाणून घेण्यामध्ये चाहते उत्सुक होते. अशामध्ये या चित्रपटाच्या माध्यमातून करीना कपूरच्या पुनरागमनाच्या बातम्याही समोर आल्या आहेत. पुढच्या महिन्यात ती या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘सिंघम अगेन’ हा बिग बजेट चित्रपट लवकरत तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटात करीना कपूर पुनरागमन करत आहे. ‘सिंघम रिटर्न्स’नंतर ती ‘सिंघम अगेन’मधून पुनरागमन करणार असून लवकरच शूटिंग देखील सुरू करणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ती हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. तिचे शूटिंग १२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत करिनाचे पुनरागमन पाहणे खूपच मनोरंजक आहे. या चित्रपटामध्ये करीना दिसणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.दरम्यान, अक्षय कुमार देखील पुढील महिन्यातच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात आधीच अजय, रणवीर, करीना आणि अक्षयसोबत मोठी स्टारकास्ट आहे. तर, गेल्या वर्षी रोहितने दीपिका पदुकोण ही पहिली महिला पोलीस बनणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे तिचीही एन्ट्री या चित्रपटातून होण्याची शक्यता आहे. याशिवाय टायगर श्रॉफ पोलीस बनल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी अर्जुन कपूरसोबत बोलणी झाल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. ‘सिंघम अगेन’ पुढच्या वर्षी २०२४ मध्ये १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: