Wednesday, April 17, 2024

पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर दरोड्यातील सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, गुन्ह्याची कबुली

टाकळी मानूर दरोडा प्रकरणी 6 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक, एकुण 13 आरोपीचा समावेश, 7 गुन्ह्यांची कबुली.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 13 मार्च, 2024 रोजी फिर्यादी श्री. बाबासाहेब उत्तम ढाकणे वय 74, रा. अंबिका नगर, टाकळी मानूर, ता. पाथर्डी हे कुटूबिंयासह घरात झोपलेले असताना 20 ते 25 वयाचे अनोळखी 8-9 इसमांनी घरात प्रवेश करुन फिर्यादी व त्यांचे कुटूबियांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन, सत्तुरचा धाक दाखवुन घरातील 66,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख व विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरुन नेले बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 2542024 भादविक 395, 397, 504 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन दिनांक 14/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोउपनि/तुषार धाकराव, सोपान गोरे, मनोहर शेजवळ व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, विशाल दळवी, पंकज व्यवहारे, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, संदीप चव्हाण, राहुल सोळुंके, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, रोहित मिसाळ, अमृत आढाव, अमोल कोतकर जालिंदर माने, रविंद्र घुगांसे, मच्छिंद्र बर्डे, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, भरत बुधवंत व अरुण मोरे अशांची 3 विशेष पथके तयार करुन पथकास आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने घटना ठिकाणी भेट देवून आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत तसेच पाथर्डी परिसर व लगतचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार पोलीस स्टेशनला अशा प्रकारे दाखल असलेल्या गुन्हा ठिकाणी जावून फिर्यादीकडुन आरोपींचे वर्णन तसेच गेले मालाबाबत माहिती घेता शिरुर कासार येथील गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईलचे व सदर घटना ठिकाणचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना दिनांक 16/03/24 रोजी वर नमुद गुन्हा हा आरोपी नामे संदीप बबन बर्डे, रा. वारणी, जिल्हा बीड याने व त्याचे इतर 10 ते 12 साथीदारांनी केला असुन ते पुन्हा कोठेतरी चोरी करण्यासाठी त्यांचेकडील पांढरे रंगाची पिकअप गाडीने पाथर्डी येथुन मोहटादेवी रोडने जाणार आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी गुप्तबातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने पथकने लागलीच पाथर्डी ते मोहटादेवी जाणारे रोडवर कारेगांव फाटा, पाथर्डी येथे जावुन सापळा रचुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे पिकअप वाहन येताना दिसले. खात्री होताच पथकाने ताब्यातील वाहने रोडला आडवी लावली असता पिकअप चालकाने त्याचे ताब्यातील गाडी थोड्या अंतरावर थांबविली. त्यावेळी पिकगाडीचे पाठीमागील हौदात बसलेल्या इसमांपैकी 03 इसम गाडीतुन उडी मारुन पळुन गेले. उर्वरीत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पिकअप गाडीचे केबिनमध्ये असलेले 03 व पाठीमागील हौदामध्ये बसलेले 02 इसमांना ताब्यात घेवुन त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) आजिनाथ भागीनाथ पवार वय 26, रा. आर्वी, ता. शिरुर कासार, जिल्हा बीड, 2) गणेश रामनाथ
//2//
पवार वय 25, रा. ब्रम्हगव्हाण, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 3) विनोद बबन बर्डे वय 27, रा. वारणी, ता. शिरुर कासार, जिल्हा बीड, 4) अविनाश काशिनाथ मेहेत्रे वय 28, रा. कुळधरण रोड, कर्जत, ता. कर्जत, 5) अमोल सुभाष मंजुळे वय 23, रा. वडगांव पिंपरी, ता. कर्जत असे सांगितले. त्यांना पळुन गेलेल्या इसमांचे नांव गांव विचारता इसम नामे विनोद बर्डे याने पळुन गेलेल्या इसमांची नावे 6) संदीप बबन बर्डे रा. शिरुर कासार, जिल्हा बीड (फरार) 7) पप्पु उर्फ राहुल दिलीप येवले, रा. शिरुर कासार, जिल्हा बीड (फरार) 8) अक्षय सुरेश पवार रा. वडगांव तनपुरा, ता. कर्जत (फरार) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे 9) बाबासाहेब भवर रा. वडगांव, ता. पाथर्डी (फरार) 10) विशाल जगन्नाथ मंजुळे रा. वडगांव तनपुरा, ता. कर्जत (फरार) 11) भारत फुलमाळी रा. वारणी, ता. शिरुर कासार, जि. बीड (फरार), 12) विकास उर्फ हरी पोपट सुळ रा. वडगांव तनपुरा, ता. कर्जत (फरार)यांचे सोबत गुन्हा केल्याची सांगुन साथीदार नामे 13) तुकाराम धोंडीबा पवार, रा. पाथर्डी हा आम्हाला चोरी करणे करीता आगोदर बोलावुन घेवुन कोठे चोरी करायची ते ठिकाण दाखवतो व त्यानंतर आम्ही रात्रीचे वेळी जावुन चोरी करतो व चोरी केलेले सोने तुकाराम पवार याचेकडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देतो असे सांगितल्याने त्याचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडुन 28 ग्रॅम वजनाचे 1,68,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 29,400/- रुपये रोख, 20,000/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन, 6,00,000/- रुपये किंमतीची पिकअप व 200/- रुपये किंमतीची हत्यारे असा एकुण 8,17,600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यातील आरोपींना पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 254/24 भादविक 395, 397, 504 या गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

आरोपी नामे तुकाराम धोंडीबा पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, चोरी व इतर कलमान्वये एकुण 9 गुन्हे दाखल आहेत

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles