सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. शिकारी पक्षातील सर्वच पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून गरूड हा पक्ष्यांचा राजा एक ते दीड मैलावरची शिकार पाहू शकतो. सर्व पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे. असं म्हणतात की, त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करु शकतो. मात्र यावेळी गरुडाने चक्क मगरीशी पंगा घेतला आहे.
एक गरुड मगरीपासून तिची शिकार घेऊन पळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मगरीला पाहून गरुड पंख फडफडवत उडण्याचा प्रयत्न करतो, पण मगर आपली शिकार हातातून गेल्याच्या रागातून असा कमबॅक करते की गरुडाला पळ काढावा लागला. अशा स्थितीत आपला जीव वाचवण्यासाठी गरुड शिकारीला नदीकाठी सोडून पळून जातो, तर मगर शिकार पकडून त्याला खाऊ लागते.सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे कोणालाच कमी समजू नका, कधी डाव उलटेल हे सांगू शकत नाही.हा व्हिडिओ सोशल मीडियावर @Latestsightings नावाच्या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे.