केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी कुटुंबावर शेतकऱ्यांची जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप केला आहे. अमेठीतील शेतकऱ्यांची फसवणूक आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली त्यांच्या जमिनी गांधी कुटुंबाने हडप केल्या, असे त्या म्हणाल्या. गांधी कुटुंबाने तेथील औद्योगिकीकरणाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची 30 एकर जमीन अवघ्या 600 रुपये भाड्याने बळकावली आहे. एएनआय या वृत्त संस्थेच्या स्मिता प्रकाश यांना दिलेल्या पॉडकास्टमध्ये इराणी यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.
अमेठीतील लोकांच्या जमिनी गांधी घराण्याने हडप केल्या आहेत. मी संसदेतही ही गोष्ट सांगितली आहे. 30 एकर जमीन 600 रुपयांना भाड्याने दिली आहे. पण गांधी परिवाराने तिथे स्वतःसाठी एक प्रशस्त कॉम्प्लेक्स बांधले आहे. औद्योगिकीकरणाच्या नावाखाली तेथे जमिनी घेतल्या आहेत,” असा आरोप इराणी यांनी केला.