Saturday, May 18, 2024

Video: काकूंचा नागिन डान्स पासून काकांनी घेतला सापाचा अवतार! पुंगी घेऊन आजोबाही थिरकले

पार्टी म्हटली नाचगाणं आलंच. नाच म्हटला की त्याला वयाचं काही बंधन नसतंच. ज्यांचं मन तरुण असतं, अशा वयस्कर लोकांनाही कधीकधी नाचण्याचा मोह आवरता येत नाही. मनाने तरुण असणाऱ्या अशा वयस्कर काकांचा व्हिडीओ सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय.

एका पार्टीत नागिन गाण्यावर नाचणाऱ्या एका महिलेचे ठुमके पाहून दोन काकांना स्वतःला रोखता आलं नाही. ते दोघंही पुढे आले आणि त्यांनी या पार्टीत चक्क सापाचा अवतार घेऊन ज्या स्टेप्स मारल्या, त्या आता कमालीच्या व्हायरल झाल्यात व्हायरल व्हिडीओमध्ये एका काकांनी नागाची पुंगी वाजवण्याचा अभिनय करत डान्स करण्याचा प्रयत्न केल्याचं तुम्ही पाहू शकताय. मै नागिन तू सपेरा गाण्यावर थिरकताना सुरुवातील काकूंची दिसत होत्या. पण नंतर आलेल्या दुसऱ्या काकांनी तर चक्क सापासारखं अंग वळवण्याचा प्रयत्न केला आणि जमिनीवरच सापासारखे लोळलेही. या तिघांनी मिळून केलेला हा डान्स पाहून उपस्थितांना हसूही रोखता आलं नाही. सगळ्यांनीच मिळून या हटके डान्सचा आनंद घेतला.
@Hi_itsok या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles