सध्या सर्वत्र प्री-वेडिंग शूटचं ट्रेंन्ड सुरू आहे. लग्न ठरल्यावर अनेक कपल प्री-वेडिंग शूट करतात. यासाठी कोण काय करेल आणि काय नाही याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर प्री-वेडिंग शूटचा एक खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी पोज देत असताना त्यांच्यासमोर चक्क एक साप आला आहे.
प्री-वेडिंग शूटसाठी सर्वात भन्नाट जागा असावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी बरेचजण निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करायचं असं ठरवतात. मग कोणी डोंगराळ जागेवर, गड किल्ल्यांवर किंवा नदी सारख्या ठिकणी फोटोशूट करतात. अशात या कपलने या पलिकडे जाऊन विचार केलाय. यांनी एका नदीकाठी फोटोशूट केलं आहे. मात्र सकाळी नाही तर रात्री. रात्रीच्या अंधारात हे दोघेही एकमेकांना मिठीत घेत मस्त पोज देत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा आणि नवरी दोघेही सुंदर ड्रेस घालून रेडी झालेत. तसेच हे दोघीही नदीकाठी पाण्यात बसलेत. रॉमँटीक सीन क्रियेट करण्यासाठी फोटोग्राफरसह ४ ते ५ जणांची टीम देखील येथे उपस्थित आहे. यावेळी फोटोग्राफर कपल उभे असेल्या ठिकाणी स्मोक क्लाउड तयार करतात. यामुळे पाण्यात लपून बसलेला साप बाहेर येतो.
Video:प्री-वेडिंग शूटमध्ये सापाची एन्ट्री; नवरा नवरीचा उडाला थरकाप
- Advertisement -