Tuesday, May 28, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत तब्बल इतक्या तक्रारी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्या आहेत. या सी-व्हिजिल ॲपवरील शंभर टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे.

ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार किरण देवतरसे यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम १६ मार्च रोजी जाहीर केला. तेव्हापासूनच आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही कामे २४ तासांमध्ये, तर काही कामे ४८ तासांमध्ये पूर्ण करणे आवश्‍यक होते.आचारसंहिता लागू झाल्यावर स्थानिक प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील राजकीय पक्षांचे फलक, विकासकामांच्या कोनशिला झाकण्यासाठी भरारी पथके स्थापन केले. खासगी मालमत्तेवर राजकीय पक्षांचे चिन्ह, फलक असल्यास ते काढून टाकण्याची जबाबदारी संबंधितांवर होती.

फलक लावणे, झेंडे लावणे इतर कारणाने सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण करण्यावर बंदी घातली आहे. ज्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, भित्तीपत्रके चिकटविली होती, त्यांना ती तातडीने हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles