एका मुलीचा साबन खाताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून कोणीही चकित होईल. कारण मुलगी म्हणजे मला साबन आवडतो आणि खायला लागते. हे प्रकरण थक्क करणारं आहे मात्र तुम्ही नीट पाहिलं तर ते साबन नसून भलतीच गोष्ट दिसते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगी उभी आहे आणि तिच्या समोरच्या टेबलवर डेटॉल आणि साबन आहे. दोन्हीपैकी तिला साबण आवडतो म्हणत ती साबण खायला लागते. नंतर जेव्हा ती तो कट करते तेव्हा समजतं की हा साबण नसून कपकेक आहे जो साबणासारखा बनवला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोलकाताचा आहे.