सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. गणपती बाप्पावर चिमुकल्या साईराजने केलेला रील व्हिडीओ नेटकऱ्यांना फार आवडला. नंतर आमच्या पप्पांनी बुटानी हाणला असं काहींनी म्हटलं आणि आता बुटानी हाणला हे गाणं व्हायरल झालं आहे. सोशल मीडियावर गणरायानंतर आता या गाण्याची क्रेज दिसत आहे.
तरुण मुलं, लहान मुलं तसेच सर्वच वयोगटातील व्यक्ती यावर रील व्हिडीओ बनवतायत. शक्यतो बाबांचा मार काही तरी चुका केल्यावरच खावा लागतो. सोशल मीडियावर काही तरुणांनी तसा सीन क्रियेट करत व्हिडीओ बनवला आहे.