काँग्रेसच्या 32 वर्षीय महिला आमदाराने इतिहास रचला आहे, ओडिशातील बाराबती-कटक विधानसभा मतदारसंघात सोफिया आमदार बनल्या आहेत. विशेष म्हणजे ओडिशातील त्या पहिल्या मुस्लीम महिला आमदार आहेत.सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत राज्याच्या प्रगतीसाठी सर्व शाळा, सर्व कॉलेजमध्ये क्लालिटी एज्युकेशनवर भर दिला जावा, असे त्यांनी म्हटले.
विधानसभेत बोलताना त्यांनी राज्यातील क्वालिटी एज्युकेशनवर भर दिला, त्यामुळे, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
सोफिया फिरदौस ह्या काँग्रेसचे वरिष्ठ नेता मोहम्मद मोकिम यांच्या कन्या आहेत. त्यांनी भाजप उमेदवार पूर्ण चंद्र महापात्रा यांचा 8,001 मतांनी पराभव करुन आमदारकी मिळवली आहे.