Wednesday, April 17, 2024

नगर शहरातील डीएसपी चौकातील उड्डाणपूल कामासाठी माती परीक्षण सुरू

नगर : शहराचे उड्डाणपुलाचे स्वप्न अनेक वर्षानंतर प्रत्यक्षात साकारल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगर शहरामध्ये पुन्हा नव्याने उड्डाणपूल उभारण्यात येणार असून शहरातील डीएसपी चौक, पत्रकार चौक व एमआयडीसीतील सह्याद्री चौक या ठिकाणी होणाऱ्या नव्या उड्डाणपूल कामासाठी निधी मंजूर करून दिला आहे त्यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात डीएसपी चौकातील माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे त्यामुळे नगर शहरात पुन्हा तीन उड्डाणपूल साकारणार आहेत या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडणार आहे. नगर शहर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणावरून राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात आहे त्यामुळे जड वाहतूक व दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असून परिणामी वाहतूक कोंडी होत आहे याचबरोबर नगर शहराचे विस्तारीकरण झपाट्याने वाढत आहे पुढील अनेक वर्षांचा विचार करून शहरांमध्ये उड्डाणपुलाची गरज भासणार आहे, त्यानिमित्ताने शहरात साकारत असलेले उड्डाणपूल भविष्यात उपयोगी येणार आहे या माध्यमातून शहर विकासाला देखील गती मिळेल, शहरातील डीएसपी चौकातील उड्डाणपूल कामासाठी माती परीक्षण सुरू झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत असून या उड्डाणपूलाचे प्रत्यक्षात काम कधी सुरु होणार याची नागरिकांना प्रतिक्षा लागली आहे

नगर शहरातील डीएसपी चौक, पत्रकार चौक व सह्याद्री चौक हे वर्दळीचे ठिकाण असून मोठ्या प्रमाणात येथे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे, त्यातून सतत छोटे मोठे अपघात होवून काही जन जखमी झालेत, तर अनेकांचा दुर्दैवी बळी गेला आहे, मात्र या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही आणि अपघातावर देखील नियंत्रण येईल,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles