Wednesday, April 30, 2025

आधी पत्नीची हत्या, नंतर ५ वर्षांच्या मुलाला संपवलं; शिक्षकाने क्षणार्धात अख्खं कुटुंबच संपवलं

जिल्हा परिषद शाळेत मुलांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या एका शिक्षकाने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर पोटच्या ५ वर्षीय मुलाची देखील हत्या केली. इतक्यावरच न थांबता या शिक्षकाने स्वत:ला देखील संपवलं. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली.
अतुल मुंढे असं मृत शिक्षकाचं नाव असून तृप्ती मुंढे आणि ओम मुंढे अशी हत्या झालेल्या माय-लेकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

अतुल यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचे गुढ अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, एकाच कुटुंबातील तिघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते.तर अतुल यांच्या पत्नी तृप्ती या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षका होत्या. दोघांना ५ वर्षांचा मुलगा नाव ओम देखील होता. सगळं काही सुरळीत सुरू असताना मंगळवारी दुपारच्या सुमारास अतुल मुंढे यांनी पत्नी तृप्ती यांची चाकूने गळा चिरुन हत्या केली.

त्यानंतर त्यांनी मुलगा ओम याचा देखील उशीने तोंड दाबून खून केला. या संपूर्ण घटनेनंतर अतुल यांनी देखील स्वत: गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, शिक्षक दाम्पत्याच्या मृत्यूची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मृतांच्या घरासमोर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles