राज्यात विकासाचा मुद्दा घेऊन आपला पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी असला तरी आपण धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडलेली नाही. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जात आहोत. काही मंडळी जनतेची दिशाभूल करतात. पण कोणत्याही धर्म, जात, पंथाबद्दल आकस न ठेवता गोरगरीब शेतकरी व जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर आपला भर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोहोळ व टेंभुर्णी येथे जनसन्मान यात्रा घेऊन अजित पवार आले होते. मोहोळ येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या पंधरा दिवसांत कोणत्याही क्षणी आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याचे संकेतही त्यांनी यावेळी बोलताना दिले. त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची उपस्थिती होती.