Saturday, May 18, 2024

फडणवीस यांनी खूप मदत केली पण माढा, सोलापूर, बारामतीत ‘मविआ’च गुलाल उधळणार, मोहिते पाटील यांचा एल्गार

आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही, आता माढाच नाहीतर सोलापूर आणि बारामतीही जिंकणार असल्याचा एल्गार जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.

मोहिते पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला खूप मदत केली. शंकर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता तेथे फडणवीस यांनी मदत केली. सुमित्रा पतसंस्थेचे एक हजार कोटी रुपये गेल्या 10 वर्षात परत केले, आता फक्त 55 कोटी राहिलेत. आमच्या सर्व संस्था चांगल्या सुरू आहेत. त्यामुळे आम्हाला ईडी-बिडीची भीती नसल्याचं मोहिते पाटील म्हणाले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांनी आधीच सांगितलं असतं तर आम्ही धैर्यशील मोहितेंना उभंच राहू दिलं नसतं, पण आता वेळ निघून गेली असल्याचं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले.
भाजपने रणजित निंबाळकर यांना उमेदवारी देताना पाच आमदार पाठीशी असल्याचं सांगितलं, पण ती त्यांनी चूक केली. आता माढा लोकसभेच्या गुलालासोबत सोलापूर आणि बारामतीचा गुलालही महविकास आघाडीचा असणार असल्याचं मोहिते पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles