सोलापूरातील कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाविकास आघाडीतून यंदा विधानसभेची जागा मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विधानसभेसाठी नरसय्या आडम यांची तयारी सुरू असून अल्पसंख्यांक मेळाव्यातून त्यांनी आमदार नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, यंदा निवडणुकीत निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर मला आडम मास्तर म्हणू नका, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.
नरसय्या आडम यांनी नेहमीच्यास्टाईलने आक्रमक भाषण केलं. तसेच, हिंदू आणि मुस्लीम यांच्यात द्वेष व तेढ निर्माण करत असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. मेळाव्यात बोलताना नरसय्या आडम यांनी नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर सडकून टीका केली. यंदाच्या वर्षी मी निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर मला आडम मास्तर म्हणू नका. नारायण राणेच्या पोट्याला देखील आमदार झाल्यानंतर बघायचं आहे. आमदार झाल्यावर त्याला (नितेश राणेला) माफी मागायला लावणार, अशा शब्दात नरसय्या आडम यांनी आक्रमक शैलीत भूमिका मांडली.