सोलापूर: पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाली. धमकी, खंडणी, हत्या यासारखे अनेक गंभीर गुन्हे असलेल्या शरद मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली. तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी शरद मोहोळला हिंदुत्ववादी म्हटले आहे.
सोलापुरातील हिंदु जन आक्रोश मोर्चात ते बोलत होते. भाजपचे आमदार नितेश राणे सभेला उपस्थित होते. शरद मोहोळ हा माझा मित्र, तो गोरक्षण करणारा होता, हिंदुत्ववादी होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली असं वक्तव्य भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा यांनी केलं. शरद मोहोळला परत पाठवा अशी देवाकडे प्रार्थना करा असं आवाहनही त्यांनी केलं.
भाजपचे तेलंगणाचे आमदार म्हणाले की, माझ्या मित्राची, शरदभाऊची हत्या केली. तो हिंदुत्ववादी नेता होता, गोरक्षण करणारा नेता होता. तुरुंगात जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचे काम शरदभाऊने केलं होतं. आता देवीकडे प्रार्थना करा आणि शरदभाऊला पुन्हा पाठवा अशी मागणी करा. आमच्यातलेच अनेक लोक दुष्मन झाले आहेत. त्यांना कसं ओळखायचं?