Saturday, January 25, 2025

धक्कादायक! पशुधन विकास अधिकाऱ्याने कार्यालयातच संपवलं जीवन, घटनेनं खळबळ

सोलापूर: कुर्डूवाडी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याने कुर्डूवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कर्तव्यावर असताना स्वतच्या कार्यालयातीलच छताच्या लाकडी वाश्याला एका दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१० जानेवारी रोजी सकाळी ९ ते दु ४ वा. दरम्यान घडली आहे. विश्वनाथ चिमाजी जगाडे (३९, मूळ रा परभणी जिल्हा परभणी, सध्या कुर्डूवाडी ता.माढा) असे गळफास घेतलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कुर्डवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पशुधन विकास अधिकारी विश्वनाथ जगाडे हे मूळचे परभणी येथील असून कुर्डूवाडी येथे गेल्या २ वर्षापासून पशुधन विभागात ते पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती सायंकाळी मिळताच परिसरातील शासकीय आणि खासगी पशुवैद्य येथील ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती. गुरूवारी सकाळी सोलापुर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.
कुर्डूवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विश्वनाथ जगाडे यांच्या आत्महत्येने सोलापुरातील स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे. आत्महत्येबाबत मात्र नेमके कारण समजू शकले नसले तरी त्यांना शासकीय कामाचा अधिक ताण होता, अशी चर्चा पशू वैद्यकीय विभागात दबक्या आवाजात सुरु होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles