Monday, March 17, 2025

विजयी आमदाराचा पुढाकार… मताधिक्य न मिळालेल्या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेऊन करणार पडताळणी… तारीखही ठरली…

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात मतदान जागृती करण्यासाठी डिजिटल बॅनर झळकले आहेत. ”मौजे मारकडवाडी (ता.माळशिरस) गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान पडताळणी प्रक्रिया पार पाडावयाची आहे. आपण दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, याची नोंद घ्यावी.”, अशा आशयाचा संदेश या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

उत्तम जानकर यांना कमी मतं, सातपुतेंना मताधिक्य
मारकडवाडी गावात यापूर्वी उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. मात्र, यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे. यंदाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचे सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles