Sunday, July 14, 2024

सुशिलकुमार शिंदेंची राजकारणातून निवृत्ती, जाहीर केला सोलापूर लोकसभेचा उमेदवार

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, मला जे करता येईल ती मदत मी करणार” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावेळी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे निवडणुकीपूर्वी घोषित केलं होतं. मात्र त्या निवडणुकीत वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे मैदानात असल्याने, सुशीलकुमार शिंदेंना विजय मिळवता आला नव्हता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles