राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना सोमवारी सकाळी….सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.यावेळी त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजने बाबत बोलताना राज्य सरकारवर टीका केली. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणण्यापेक्षा लाडका मतदार योजना आणा.म्हणजे सगळ्यांना पैसे वाटप करण्यासाठी मोकळे व्हाल, अशी खोचक टीका त्यांनी केली.