Monday, September 16, 2024

शिंदे आणि अजितदादा गटाला मोठं खिंडार; दोन बडे नेते महाविकास आघाडीत

विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. अजित पवार गटाच्या दोन स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी काल जयंत पाटालांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

सोलापूरच्या टेभुर्णीत आमदार बबनराव शिंदेंना विजयसिंह मोहिते पाटलांनी राजकीय धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत देशमुख बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. जयंत पाटलांच्या उपस्थितीत टेभुर्णीच्या सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. परिवर्तनाची तुतारी माढ्यात वाजणार असल्याचा निर्धार देशमुख बंधूंनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डी. एस. सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्हात पहिला झटका बसला आहे. आमदार शहाजी बापू पाटलांच्या चुकीच्या कार्य पद्धतीमुळे पक्ष सोडला आहे, असा गंभीर आरोप डी. एस. सावंतांनी केला आहे. राज्याचे नेतृत्व जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले असले तरी जिल्हातले पदाधिकारी, आमदार हे व्यवस्थित वागत नाहीत. त्यांची वागणूक व्यवस्थित नसल्याने शिवसेनेतून बाहेर पडलो आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles