मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिवाळीच्या मुहूर्तावर दुबईत आलिशान घर खरेदी केलं.दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर केलेल्या फोटोंना “पाडवा in the new होम” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
नव्या घरातील गृहप्रवेशाच्या निमित्ताने तिने यंदाची दिवाळी नवऱ्याबरोबर दुबईत साजरी केली.
सोनालीच्या नवीन घरातील सुंदर व्ह्यू आणि दारावरच्या हटके नेमप्लेटने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोनाली व कुणालच्या नवीन घराच्या नेमप्लेटवर दोघांची टोपणनावं लिहिण्यात आली आहेत.
अभिनेत्रीला सगळेजण प्रेमाने सोना, तर तिचा नवरा कुणाल बेनोडेकरला सगळे प्रेमाने केनो म्हणतात.
यानुसार या दोघांनी नव्या घरातील नेमप्लेटवर #केनोसोना (#KenoSona) असं लिहून घेतलं आहे.