Tuesday, June 25, 2024

पुण्यात आलिशान कारने दोघांना चिरडणाऱ्या मुलाचा आणखी प्रताप… सोनाली प्राजक्त तनपुरेंचे ट्विट

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना नुकतीच घडली होती. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि एकूण कुटुंबाविषयी नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. या घटनेनंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सोनाली तनपुरे यांनी या अपघातप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयी अप्रत्यक्षपणे एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

सोनाली तनपुरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा एकूण सूर पाहता त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेने असल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे. https://x.com/TanpureSonali/status/1792997540901556676

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles