‘मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडतेय’, असं ठामपणे सांगून शरद पवारांची साथ सोडणाऱ्या सोनिया दुहान यांनी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोनिया दुहान या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जात होत्या. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरिस त्यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा पक्षांतर्गत मोठी खळबळ माजली होती. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बाँड समजल्या जात होत्या.
एक्सवरील पोस्टमध्ये सोनिया दुहान म्हणाल्या, आज दिल्लीत खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या नीतीला प्रभावित होऊन हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भुपिंदर शुदा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष उदयभान यांच्या नेतृ्त्त्वाखाली विधानसभेच्या माझ्या समर्थकांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मिशन २०२४ च्या काँग्रेसला पाठिंबा देण्याचं काम करणार आहे. येणाऱ्या काळात हरियाणाच्या सर्व विधानसभेसाठी जुन्या सहकाऱ्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे”, असं सोनिया दुहान म्हणाल्या.
https://x.com/DoohanSonia/status/1820833312535191659?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1820833312535191659%7Ctwgr%5Ed551a02a174725b027a3a642b5b2c84e07d74710%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fsonia-doohan-joined-congress-after-leaving-sharad-pawar-group-sgk-96-4522802%2F