सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 5 हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या 10 सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत दिले आहेत.
या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी रुपये असा एकूण 4194.68 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.