वाशीम बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील उच्चांक दर मिळाला आहे. प्रती क्विंटलला सोयाबीनला 5 हजार 451 रुपयांचा दर मिळाला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या वर्षभरापासून पडलेल्या सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्याचं चित्र आज वाशिम बाजार समितीमध्ये पाहायला मिळालं.
वाशीम बाजार समितीमध्ये सोयाबीनला यावर्षीच्या हंगामातील उच्चांकी दर मिळाला आहे. प्रति क्विंटलसाठी 5451 रुपयांचा दर मिळाला असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. गेल्या वर्षभरापासून 4 हजार 200 ते 4 हजार 800 दरम्यान विक्री होणाऱ्या सोयाबीनला ऐन सणासुदीच्या काळात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या काळात दरवाढ होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. वाशीम बाजार समितीमध्ये आज 15000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.