शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक १० जानेवारी रोजी निकाल दिला. या निकालानुसार शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार पात्र ठरले आहेत. नार्वेकरांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही.
उद्धव ठाकरे यांच्या गटाने नार्वेकरांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर, ठाकरे गटातील आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात शिदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राहुल नार्वेकर यांच्या निकालावर शिवसेनेचे दोन्ही गट असंतुष्ट असून दोन्ही गटांनी न्यायालयात धाव घेतली आहेच.