अजितदादांनी आधी सांगितलं असतं तर विधानसभा लढवलीच नसती, सभापती राम शिंदे यांची प्रतिक्रिया

0
53

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असं करायचं होतं तर…’ सभापती होताच सभापती प्रा. राम शिंदे बोलले…
मला तर माहित असतं आणि अजित पवार यांनी सांगितलं असतं की मला सभापती करणार आहेत. तर मी निवडणूक लढवलीच नसती, अशा शब्दात विधान परिषदेचे नूतन सभापती राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. आता मी एका पदावर बसलो आहे. त्यामुळे आता पुन्हा पुन्हा ती चर्चा करणे योग्य होणार नाही असंही शिंदे यांनी म्हटले आहे.

विधानपरिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीत मी कर्जत जामखेड येथे प्रचार सभा न घेतल्याने शिंदे नाराज होते.‌अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला.‌पण पराभव झाला म्हणूनच ते आज सभागृहात सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत. यावरून सभागृहात एकच हशा उसळला.