Wednesday, April 30, 2025

बंपर ऑफर…इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक चार चाकीवर 4 हजार ते 4 लाखांचा डिस्काउंट

सध्या ई-बाईक किंवा ई-कारचा बोलबोला आहे. त्यामुळे, या वाहनांवरही कंपन्यांकडून तब्बल ४ लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जात आहे. ऑटो क्षेत्रातील काही कंपन्यांकडून अनेक गाड्यांवर ही ऑफर सुरू आहे. देशातील नावाजलेल्या Tata, Hyundai आणि Mahindra कंपनीच्या वाहनांवर डिसेंबर महिन्यात या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर ईव्ही वाहनांवर मोठी सूट आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो आणि हीरो मोटोकॉर्प यासारख्या कंपन्यांकडून ही सूट देण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हीकलवर ४ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. तर, इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या खरेदीवर ३,००० ते १०,००० रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात आली आहे.

हुंडाई कोना (Hyundai kona) वर ४ लाख रुपयांपर्यत डिस्काउंट
महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) च्या गाड्यांवर ३,५ लाख रुपयांपर्यतची सूट आहे.
टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) वर २.७ लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट
टाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV) वर १ लाख रुपयांपर्यंतची ऑफर
टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) वर ८०,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.

टू-व्हीलर वाहनांवर डिस्काउंट

होंडा (Honda) च्या गाड्यांवर १२,८०० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट
बजाज ऑटो (Bajaj Auto) च्या गाड्यांवर ३ हजार ते १० हजार रुपयांपर्यंतची सूट
टीव्हीएस मोटर्स (TVS Motor) वर ४,००० रुपयांपर्यंतची सूट
यामाहा (Yamaha) च्या दुचाकीवर ३ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट
हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनीच्या गाड्यांवर २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles