एका तरुणानं तब्बल १ हजार रुपयांचा डोसा खाल्ला. अर्थातच १ हजार रुपयांचा डोसा म्हटलं तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असेल असं तुम्हाला वाटलं असेल. पण खरं सांगायचं झालं तर हा डोसा पार रस्त्यावर मिळणाऱ्या डोस्यासारखाच दिसतोय. मग या तरुणाला हॉटेलवाल्यांनी गंडवलं तरी कसं?
हा प्रकार हरियाणामधील गुरूग्राम या ठिकाणी घडला आहे. हा तरुण एका दाक्षिणात्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेला होता. त्यानं दोन साधे डोसे आणि एक प्लेट इडली मागवली. हे पदार्थ खाल्ल्यानंतर जेव्हा त्याला बिल मिळालं तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण हॉटेलवाल्यांनी ५० रुपयांच्या साध्या डोस्यांसाठी तब्बल १ हजार रुपये वसूल केले. हा संपूर्ण अनुभव त्यानं @ashzingh या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. अन् त्याचं हे ट्विट सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.