गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. त्यामुळे गणपतीच्या ११ दिवसांमध्ये घरोघरी विविध प्रकारचे मोदक बनवले जातात. अभिनेत्री स्पृहा जोशीने सुद्धा लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी खास उकडीचे मोदक बनवले आहेत.
प्रथम उकड काढलेल्या पीठाची पाती बनवून स्पृहाने त्यात ओल्या खोबऱ्याचं सारण भरलं. त्यानंतर सुंदर अशा कळ्या काढून अभिनेत्री मोदक वळत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्पृहाने “गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा!! हॅप्पी मोदक डे” असं लिहिलं आहे.