लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील पवार कुटुंबामधील लढतीची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. या लढतीमध्ये अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर तुफान हल्ला केला होता. त्यांनी काटेवाडीत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मार्मिक उत्तर दिले आहे. त्यांनी एका आर्थाने श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे. रक्ताची नाती कधी तुटत नाही, विरोध करा, पण बोलताना भाषेवर नियंत्रण ठेवा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे.
अजितदादांचे बरेचसे नातेवाईक त्यांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत. तुम्हाला अजित दांदाना विरोध करायचे असले तर जरुर करा. पण विरोध करताना भाषेवर नियंत्रण ठेवा. आज राजकारणात तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिला तरी तुमची रक्ताची नाती तुटत नाही. आज ना उद्या तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र यावे लागणार आहे. एखाद्या कार्यक्रमास तुम्ही सर्व एकत्र याल. एकमेकांचे तोंड पाहाल. ही रक्ताची नाती तुटत नाही, हे लक्षात ठेवा, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.