Saturday, January 25, 2025

सासरे सून कौटुंबिक कलह….. असा सासराही कुणाला नको…

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी, सभासद, कामगार आणि संलग्न संस्थांच्या हिताचे प्रश्न मांडले. संस्थेचे हित मांडल्याने सासर्‍याचे वाटोळे कसे होणार? माझ्यासारखी सून नको म्हणता मग स्वतःच्या बापाचे वाटोळे करणारी मुलगी कशी चालते? असा प्रति सवाल पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांनी त्यांचे सासरे माजी आ. भानुदास मुरकुटे यांना केला. बुधवारी अशोक सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत डॉ. मुरकुटे यांनी उसाला तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी केली.

त्याचबरोबर कामगार व शिक्षण संस्थेशी संबंधित प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर माजी आ.मुरकुटे यांनी डॉ.वंदना मुरकुटे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या सासर्‍याचे वाटोळे करणारी सूनबाई कुणालाच नको, असे म्हटले होते. त्यांच्या टिकेला उत्तर देताना डॉ.वंदना मुरकुटे प्रसिध्दी पत्रकात म्हणाल्या, अशोक कारखान्यावर 341 कोटींचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घेण्याची वेळ कारखान्यावर येत असताना शिक्षण संस्थांवर अवाजवी खर्च केला जातो. तो आपण सभेत निदर्शनास आणून दिला. शिक्षण संस्थेतून येणारे उत्पन्न दाखविले जात नाही. काटकसरीचा स्वभाव असलेल्या माजी आ. मुरकुटे यांनी कारखान्याच्या खर्चात कपात करणे अपेक्षित असताना वेगवेगळ्या प्रकल्पांवर अवास्तव खर्च केल्याने कारखान्याची आर्थिक घडी बिघडली.

चुका निदर्शनास आणून दिल्याने ते चिडले आणि सभेत व्यक्तिगत टीका केली. महिलांविषयी त्यांची मतं आणि धारणा चुकीच्या असल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले. जर त्यांचा कारभार पारदर्शी असला तर त्यांनी माझ्यावर टक्षका करण्याऐवजी सभेत मी, उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा तसेच मी त्यांचे काय वाटोळे केले? याचाही खूलासा करावा, असे आव्हान डॉ. वंदना यांनी माजी आ.मुरकुटे यांना दिले.

कौटुंबिक कलहानंतर पती ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या साथीने मी शुन्यातून विश्व निर्माण केले. काँग्रेस पक्षाकडून पंचायत समितीला विजयी झाले. मुरकुटे यांनी विरोध करूनही सभापती झाले. स्वतःची शिक्षण संस्था उभी केली. अशोक कारखान्याच्या निवडणुकीत टाकळीभान गटात थेट त्यांच्याविरोधात उभी राहून दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली. ही प्रगती आता सासरे मुरकुटे यांना सहन होत नाही. नावडत्या पत्नीवर अन्याय केला, आता मुलगा आणि सुनेलाही त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मदत तर नाहीच पण नेहमी त्रास देणारा असा सासरा कुठल्याही सुनेला नको, अशी कोटीही डॉ.वंदना मुरकुटे यांनी यावेळी बोलताना केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles