Saturday, October 12, 2024

राज्य सरकारने शब्द फिरवला… एस.टी.कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली पण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत एसटी कर्मचारी संघटनांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर संपन्न झाली होती. त्यात कर्मचाऱ्यांना पगारवाढ 2020 पासून लागू करण्याचा निर्णय झाला होता. पण आता सरकारने शब्द फिरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरसकट सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची पगारवाढ एप्रिल 2020 पासून देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या बैठकीत स्पष्ट सांगितले होते. पण ही पगारवाढ एप्रिल 2020 पासून नाही तर सप्टेंबर 2024 पासून लागू होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले आहे.सरकारने एप्रिल 2020 पासून पगारवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा कोण गाजावाजा माध्यमांसमोर झाला होता. श्रेयवादासाठी माध्यमांसमोर मोठा ड्रामा काही नेत्यांनी केला होता. पण प्रत्यक्षात आता कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. मिनिट्स काढताना राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर फरकाची रक्कम देण्याचे गाजर दाखवण्यात आले आहे. सरकारची ही चालखी उघड झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सरकारने शब्द फिरवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles