SSC Recruitment 2024 कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित पदवी स्तर परीक्षा २०२४ साठी अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती मोहिम विविध घटनात्मक संस्था, वैधानिक संस्था आणि न्यायाधिकरणांसह भारत सरकारची अनेक मंत्रालये, विभाग आणि संस्थेच्या गट ‘बी’ आणि गट ‘सी’च्या विविध पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गंत सुमारे १७,७२७ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. अर्जाची प्रक्रिया २४ जून २०२४ रोजी सुरू झाली आणि ती २४ जुलै २०२४ पर्यंत सुरू राहील. महत्त्वाच्या तारखा
१) अधिसूचना जारी – २४ जून २०२४
२) ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारखा -२४ जून २०२४ ते २४ जुलै २०२४
३) अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आणि वेळ -२४ जुलै २०२४ (२३:००)
४) ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ – २५ जुलै २०२४(२३:००)
५) अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो – १० ऑगस्ट २०२४ ते ११ ऑगस्ट २०२४ (२३:००)
६) टियर-१ परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक- सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२४
७) टियर-२ परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक – डिसेंबर, २०२४