महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही उत्सुकता लागून राहिली होती.आता अखेर निकाल जाहीर झाल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे. सध्या अशाच एका खतरनाक सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलीच्या आईने घेतलेला बदला पाहून तुम्हीही चक्रावून जाल.
सगळी दुनिया जरी विरोधात गेली तरी आपले आई-वडिलच असतात जे आपल्यावर विश्वास ठेवतात. लाख वेळा आपण हरलो तरी आपल्या जिंकण्याची आशा करणारे हे फक्त आई-वडिलच असतात. अशाच एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगासाठी एक मुलगा किंवा एक मुलगी असली तरी आई-वडिलांसाठी आपली लेकरं ही राजकुमार किंवा राजकमारीपेक्षा कमी नसतात. अशावेळी आपल्या मुलांना कुणी चुकीचं बोललेलेही आई-वडिल सहन करन घेत नाहीत. अशाच एका आईनं आपल्या मलीला मुद्दाम नावे ठेवणाऱ्या शेजाऱ्यांचा निकाल लागल्यानंतर जागीच पाणउतारा केला आहे. या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
https://x.com/jpsin1/status/1792842204375064998?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1792842204375064998%7Ctwgr%5E8b542070e95a7af0a9f50e1f00c29713ba14fd91%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fssc-result-2024-women-take-revenge-from-neighbors-who-bullying-daughter-success-video-goes-viral-srk-21-4394342%2F