Friday, December 1, 2023

राज्यातील एसटी कर्मचारी आजपासून संपावर जाणार; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याची हाक दिली आहे. एसटी महामंडळाचं शासनात विलीनिकरण करावं, या मागणीसाठी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. आजपासून म्हणजेच ६ नोव्हेंबरपासून एसटी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन केलं जाणार असल्याची नोटीस जनसंघाच्या अध्यक्ष जयश्री पाटील यांनी एसटी महामंडळाला रविवारी दिली आहे. त्यामुळं आता दिवाळीला एसटी बसने घरी जाणाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, त्यांनी कामावर हजर राहावं, असं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे. यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अनेक महिने संप सुरू असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.
दरम्यान, राज्य सरकारने हा संप मोडीत काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तब्बल ४ महिन्यांनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांची विलिनिकरणाची मागणी मान्य केलेली नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कामगार संपावर जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?एसटीचं शासनात विलिनिकरण, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिस्त आवेदन पद्धती आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचारी विविध शहरांमध्ये काम बंद ठेवून आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच आता आणकी एका आंदोलनाने जोर धरल्याने शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: