Wednesday, May 14, 2025

लाडकी सून योजना सुरू करा, दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नीची मागणी

राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूपच चर्चेत आहे. अलीकडेच राज्य सरकारने ही योजना आणली असून याला राज्यातून मोठ्या प्रमाणात महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी सून योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी ही मागणी केली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना आणली, तशीच लाडकी सून योजना सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली. एका शासकीय कार्यक्रमात बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.किरण वळसे पाटील म्हणाल्या की, प्रत्येक महिला ही सुनेच्या भुमिकेत आहे, त्या सुनेचं दुःख कोणाला काळात नाही. त्यामुळे आता लाडकी बहिण योजनेनंतर लाडकी सून योजना सुरू करावी. याचा फायदा प्रत्येक महिलेला होईल, असं त्या म्हणाल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles