Sunday, July 21, 2024

SBI Recruitment:स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १५० रिक्त जागांसाठी भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही बँकेत काम करायचे असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेत रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ७ जून २०२४ पासून सुरु झाली आहे. २८ जून २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या पदासाठी ही भरती आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. www.onlinesbi.sbi या वेबसाइटवर जाऊन तुम्ही फ़र्म भरु शकतात.

ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या एकूण १५० रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्याकडे आयआयबीएफ फॉरोक्स कोर्स सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे ट्रेड फायनान्ससंबंधित कोर्सचे सर्टिफिकेट असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती पाहू शकतात.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान २३ ते ३२ असणे गरजेचे आहे. ३१ डिसेंबर २०२३ च्या आधारावर वयोमर्यादा निश्चित केली जाईल. ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या जागेवर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे घेतली जाईल. मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles