Saturday, December 7, 2024

शिक्षकांची निवडणूक ड्युटीतून सुटका, निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेश

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटीतून वगळून अन्य कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. या संदर्भातील माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिली.परीक्षा कालावधी असल्याने बीएलओ ड्युटीसाठी नियमित कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घेतल्यास शाळा चालवणे अवघड जाईल. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व दहावी बारावीच्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वगळण्याची मागणी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना केली होती. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पत्र पाठवून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ड्युटीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles