मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन कधी होणार याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे पावसाळी अधिवेशन १० जूनला होणार होते, मात्र हे पुढे ढकलण्यात आले आहे. आता राज्याचे अधिवेशन २७ जूनला होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.